नांदेडमध्ये मद्यपींना शिवसैनिकांचा दणका - Marathi News 24taas.com

नांदेडमध्ये मद्यपींना शिवसैनिकांचा दणका

केशव घोणसे पाटील, www.24taas.com, नांदेड
 
नांदेडमध्ये भरचौकात असणाऱ्या दारू दुकानातल्या मद्यपींना शिवसैनिकांनी चांगलाच हिसका दाखवला. दारूच्या दुकानासमोरून जाणाऱ्या महिलांची छेड काढली जात असल्यानं दुकान बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं दारूच्या बाटल्या फोडत मद्यपींना दुकानातच कोंडून टाकण्यात आलं.
 
शहराच्या तरोडा भागातील दारूचं दुकान नशेत तर्रर्र झालेले मद्यपी बसलेले असतात. या मद्यपींकडून नेहमीच महिलांची छेड काढली जाते. मात्र त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे दारूच्या बाटल्या फोडून मद्यपींना आत बंद करण्यात आलं.
 
दारूचं हे दुकान बंद झालं नाही तर पुढील काळात मद्यपींना झोडून काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. शिवसैनिकांनी रौद्ररूप धारण करत आंदोलन करून प्रशासनाला योग्य तो संदेश दिला आहे. आता प्रशासन यावर कोणती कारवाई करणार, हे पाहायला हवं.

First Published: Thursday, February 9, 2012, 08:20


comments powered by Disqus