वीजेचा गडगडाट क्षणात कळणार - Marathi News 24taas.com

वीजेचा गडगडाट क्षणात कळणार

झी 24 तास वेब टीम, लातुर
 
पावसाळ्यात वीजेमुळे जाणाऱ्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळे वीजबळी रोखण्यासाठी केंद्रीय विज्ञान विभागाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
 

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात वीज पडून मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले. त्याचा शास्त्रीय अभ्यास करून विजेपासून संरक्षण कसे करता येईल, याचा अभ्यास केंद्रीय विज्ञान विभागाने सुरू केला आहे. नुकतीच संशोधकाची एक टीम लातुरात येऊन गेली. त्यांचा अहवाल येताच आवश्यक ती उपकरणे बसवली जातील, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी शनिवारी लातुरात दिली.
 
संशोधकांनी अहवाल देताच पुढील वर्षाच्या आत विजेला रोखणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. भूकंपासंदर्भात एक वेगळे संशोधन केंद्र किल्लारी भागात निर्माण केले जाणार आहे. त्या माध्यमातून भूकंपाची नोंद आणि त्याची माहिती मिळवण्याच्या सुविधा देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान खात्याची प्रयोगशाळा निर्माण करून त्यांनी प्रादेशिक भाषेत पावसाची माहिती मोबाइलवर देण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येईल.
 

First Published: Tuesday, November 1, 2011, 12:52


comments powered by Disqus