Last Updated: Wednesday, November 2, 2011, 08:52
झी २४ तास वेब टीम, लातूर खड्ड्यांनी साऱ्यांचे जगणं नकोसं केल आहे, दरवर्षी या खड्डयामुळे मोठ्याप्रमाणात गैरसोय होते, त्यामुळे लातूरमध्ये या खड्ड्यांचे काय करयाचे या प्रश्नाने सारेच भंडावले होते. आणि त्यासाठीच भाजपने यासाठी वेगळीच शकल्ल लढवली आहे.लातुरातील प्रभाग क्रमांक १२ मधील रस्त्यांवर खड्डयांची श्रृंखला वाढली आहे. वारंवार पाठपुरावा करुनही त्यांची दुरुस्ती होत नसल्याने शहर भाजपतर्फे या खड्डयांची महापूजा करुन पालिकेचा निषेध नोंदविण्यात आला.

कोकाटे चौक, सुतमील रोड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन बोधे नगर, कपडा मिल, विवेकानंदपुरम्, लमाण तांडा, मोतीनगर, मोरे नगर, आदर्श कॉलनी, एलआयसी कॉलनी भागातील नागरिकांची ये-जा असते. मात्र खराब रस्त्यामुळे नागरिकांची तसेच वाहनधारकांचे हाल होत आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी भाजपतर्फे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र दुरुस्ती होत नसल्याने भाजपचे शहर उपाध्यक्ष गणेश देशमुख यांच्या हस्ते खड्ड्यांची महापूजा करण्यात आली. तसेच यावेळी खड्ड्यात सिमेंटचा स्लॅब टाकावा, ठाकरे चौक ते कोकाटे चौक व रिंग रोड ते कोकाटे चौक हा सिमेंट रस्ता तातडीने तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली.
First Published: Wednesday, November 2, 2011, 08:52