Last Updated: Wednesday, February 22, 2012, 09:52
www.24taas.com, नांदेड 
नांदेडमध्ये अनोख्या पद्धतीचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. नांदेडच्या पोलीस मुख्यालयामध्ये चोरीस गेलेल्या मोटारसायकल्स आणि मृतदेहांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्याच्या २६ पोलीस ठाण्यांतर्गत विविध मोटारसायकल चोरांनी विविध ठिकाणांहून चोरलेल्या मोटारसायकली पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत. पण बऱ्याच वेळा पकडण्यात आलेली चोरीची मोटरसायकल नेमकी कुठून चोरण्यात आली होती याचा शोध लागत नाही. त्यामुळे नांदेड पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
त्यामुळे जर का एखाद्या व्यक्तीची मोटारसायकल हरवली असल्यास त्याला या प्रदर्शनाला भेट देऊन आपली मोटरसायकल मिळविता येईल. पण पोलिसांनी अशी शक्कल लढवल्याने संपूर्ण नांदेडमध्ये ह्या प्रदर्शनाचीच चर्चा आहे.
First Published: Wednesday, February 22, 2012, 09:52