केजरीवाल यांना काळे झेंडे - Marathi News 24taas.com

केजरीवाल यांना काळे झेंडे

झी २४ तास वेब टीम,  नागपूर
 
नागपुरात अरविंद केजरीवाल यांच्या कार्यक्रमात घंटानाद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्य़ाचा प्रयत्न केलाय. यावेळी केजरीवाल यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.
 
वसंतराव देशपांडे सभागृहात इंडिया अगेंस्ट करप्शन संस्थेचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी केजरीवाल आले होते. यावेळी केजरीवाल समर्थक आणि निदर्शकांमध्ये झटापटही झाली. य़ावेळी घंटानादच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.
 
सभागृहाबाहेर अण्णा समर्थक आणि घंटानादच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु असतानाच सभागृहात केजरीवाल याचं भाषण सुरु होतं. त्यांच्या भाषणात मात्र कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही. सभागृहाबाहेर काळे झेंडे दाखवणा-या १५  घटानाद संघटनेच्या आंदोलकांना पोलिसांनी  ताब्यात घेतलयं आहे.
 

First Published: Sunday, November 6, 2011, 10:17


comments powered by Disqus