अफूच्या शेतीच्या चौकशीचे आदेश - Marathi News 24taas.com

अफूच्या शेतीच्या चौकशीचे आदेश

www.24taas.com,  बीड
 
बीड जिल्ह्यातल्या अफूच्या शेतीप्रकरणात महसूल अधिका-यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खोटी शेती दाखवून अफूची शेती का केली, याची चौकशीनंतर बाब उघड होणार असल्याने कृषी अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत.
 
 
ज्या शेतांमध्ये अफू पिकवला जात होता त्या जमिनीच्या सातबारावर ऊस आणि कापूस पिकांची नोंद करण्यात आलीये. त्यामुळं जिल्हाधिका-यांनी महसूल अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. चौकशीचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
 
 
चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर लगेचचं कारवाई कऱणार असल्याचही जिल्हाधिका-यांनी सांगीतलं आहे.. शिरसाळ आणि परिसरात तब्बल ३००एकर क्षेत्रावर अफूची शेती पिकवली जाते आहे. झी 24 तासनं दाखवलेल्या वृत्तानंतर ही कारवाई करण्यात येते आहे.  अफूची लागवड करण्यात येत असल्याचं कळल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने तिथे छापा टाकला.
 
 
व्हिडिओ पाहा

 
 

First Published: Saturday, February 25, 2012, 16:15


comments powered by Disqus