Last Updated: Monday, February 27, 2012, 13:47
www.24taas.com, औरंगाबाद कॉपी प्रकरणात शिक्षकांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास शिक्षकांचा विरोध होऊ लागला आहे. शिक्षकांवर कॉपी प्रकरणी फौजदारी कारवाई केल्यास दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
शिक्षक हे शिक्षक आहेत ते गुन्हेगार नाहीत त्यामुळं त्यांना गुन्होगारासारखी वागणूक देऊ नका असा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे. वाढत्या कॉपीला आळा घालण्यासाठी सरकारनं विद्यार्थ्यांसह सुपरव्हिजन करणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई करण्याची तरतूद केली आहे. या नव्या कायद्याला शिक्षकांनी तीव्र विरोध केला आहे.
शिक्षकांच्या या नव्या पवित्र्यामुळं कॉपी रोखण्याच्या मोहिमेत अडचण निर्माण होऊ शकते.
First Published: Monday, February 27, 2012, 13:47