Last Updated: Saturday, March 10, 2012, 18:25
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे१६ तर राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. त्यामुळं केवळ दोन सदस्यांचा आघाडीला पाठिंबा मिळाल्यास त्यांची सत्ता येणार आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता असली तरी ८ सदस्य असलेल्या मनसेची राष्ट्रवादी बरोबर बोलणी सुरु आहेत. त्यामुळं नवा औरंगाबाद पॅटर्न अस्तित्वात येणार काय, याची चर्चा सुरु झालीय. याखेरीज ६ सदस्य असलेल्या भाजपचे दोन मते फुटल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक १७ जागा आहेत. मात्र संख्याबळ पाहता आघाडीला सत्तेची संधी अधिक आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेवरशिवसेनेची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात येणार आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या आहेत. परंतु त्यांचे गणित नाशिकमधील घडामोडीवर अवलंबून असणार आहे. ठाण्यात मनसेने शिवसेना-भाजप युतीला मदत केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये सेनेने सहकार्य करण्याची अपेक्षा होती. मात्र, सेनेने आपला उमेदवार महापौर पदासाठी रिंगणात उतरविल्याने राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसे युतीला मदत करील अशी शक्यता होती. जर मनसेनेने मदत केली तर युतीची सत्ता येणे शक्य आहे. नाशिकमध्ये काय घडामोडी होतात, त्यावरच औरंबादचे गणित अवलंबून आहे.
व्हिडिओ पाहा...
First Published: Saturday, March 10, 2012, 18:25