Last Updated: Sunday, March 11, 2012, 16:00
www.24taas.com, औरंगाबाद 
औरंगाबाद महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहम्मद सलिम कुरेशी यांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. कुरेशी यांचे चार मार्च रोजी अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणानंतर हत्या केल्याचं अटक करण्यात आलेल्या आठ जणांनी कबुल केलं आहे.
औरंगाबादेतील रॉक्सी सिनेमाच्या मालमत्तेच्या वादातून कुरेशी यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. सलिम कुरेशी यांच्या पत्नी ज्योती खिल्लारे सध्या विद्यमान नगरसेविका आहेत.
मालमत्तेच्या वादातून हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. कुरेशी यांचा मृतदेह औरंगाबादपासून दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या पडेगाव इथे पुरण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या पोलीस पथक पडेगाव इथे पोहचलं असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न चालु आहेत.
First Published: Sunday, March 11, 2012, 16:00