Last Updated: Monday, March 19, 2012, 18:18
www.24taas.com, बीड 
बीड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या गोपीनाथ मुंडेंच्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुंग लावला आहे. गेवराईचे भाजपचे माजी आमदार विजयसिंह पंडित यांना फोडून राष्ट्रवादीनं झेडपीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे.
पंडित यांच्या आघाडीला ५ जागा मिळाल्या आहेत. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचं संख्याबळ आहे २९. पंडित यांच्या ५ सदस्स्यांच्या साथीनं सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला ३१चा आकडा राष्ट्रवादीनं गाठला आहे. त्यापूर्वी अमरसिंह पंडित आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गोपीनाथ मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जातो.
जिल्हा परिषदेत भाजपचे २२ सदस्य आहेत, तर एका अपक्षानंही भाजपला पाठिंबा दिला आहे. अमरसिंह पंडित हे मुंडे समर्थक मानले जातात. त्यांच्या ५ सदस्यांच्या साथीनं बीड झेडपीत सत्तास्थापन करण्याचा गोपीनाथ मुंडेंचा प्रयत्न होता. मात्र विजय़सिंहांना फोडत बीड झेडपी सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला.
First Published: Monday, March 19, 2012, 18:18