माणिकरावांना दादांचा ' दे धक्का' - Marathi News 24taas.com

माणिकरावांना दादांचा ' दे धक्का'

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ
 
माणिकराव ठाकरे यांना 'दे धक्का'. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीनं त्यांच्याच यवतमाळ जिल्ह्यात दे धक्का दिला. यवतमाळमध्ये आज काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधीच धुमसत असताना आता काँग्रेसला यवतमाळमध्ये चागलंच खिंडार पडलं आहे. त्यामुळे अजित पवार विरूद्घ माणिकराव ठाकरे असे चित्र उभे झाले आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. राष्ट्रवादीच्या या दे धक्क्यामुळं माणिकराव ठाकरे आणि अजित पवारांमध्ये वादाची ठिणगी पडली. तब्बल 6 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांच्यासह माजी आमदार विजय पाटील चोंडीकर, माजी आमदार बापूसाहेब पानघाटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रमेश मानकर असे जिल्ह्यातले काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

First Published: Monday, November 14, 2011, 11:22


comments powered by Disqus