Last Updated: Tuesday, March 27, 2012, 11:36
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादमध्ये काल अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी न्यायाधिशांच्या हत्येचा कट केल्याचं पोलीस तपासात पुढे आले आहे. याबाबतची कबुली पकडण्यात आलेल्या अतिरेक्यांनीच दिली आहे. ही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
अयोध्याप्रकरणी निकाल देणा-या अलाहाबाद हायकोर्टाच्या दोन न्यायाधिशांना मारण्याचा या अतिरेक्यांचा कट होता. मध्यप्रदेशात गुन्हेगारी कारवाया करून औरंगाबाद, जालना आणि बुलढाण्यात तळ ठोकण्याचा त्यांचा इरादा होता. इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी असलेल्या या तिघांसोबत काल एटीएसची चकमक झाली होती. त्यात खलील खिलजी हा ठार झाला तर त्याचे साथीदार खलील उर्फ शाकिर हुसेन आणि अब्रार यांना अटक करण्यात आली.
संबंधित आणखी बातमी दहशतवाद्यांचे काय आहे औरंगाबाद कनेक्शन??
First Published: Tuesday, March 27, 2012, 11:36