अतिरेक्यांना आश्रय देणारे अटक - Marathi News 24taas.com

अतिरेक्यांना आश्रय देणारे अटक

www.24taas.com, औरंगाबाद 
 
औरंगाबाद एटीएसच्या पथकानं नंदूरबार शहरात छापे टाकून दोघांना अटक केली आहे. औरंगाबादच्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी काही दिवस नंदूरबारमध्ये आश्रयाला होता अशी माहिती मिळाली होती.
 
या माहितीवरुन हे छापे टाकण्यात आले. एटीएसच्या दहा जणांची टीम नंदूरबारमध्ये आली होती. या टीमनं ठिकठिकाणी छापे टाकले. एटीएसच्या टीमनं शहरातल्या दोघांना ताब्यात घेतल्याचंही सांगण्यात येतं आहे. पोलिसांनी मात्र  वृत्ताला दूजोरा दिलेला नाही.
 
तर दोन दिवसापूर्वीच औरंगाबादमध्ये एटीएसनं अहमदाबाद बॉम्बस्फोटातील वॉन्टेड अतिरेक्याचा खात्मा केला होता. तर दोघांना जिवंत पकडलं होतं. हे अतिरेकी औरंगाबादमध्ये कशासाठी आणि कुणाकडे आश्रयाला होते हे प्रश्न मात्र निर्माण झाले होते. आणि आता त्यामुळेच संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
 
 
 
 

First Published: Thursday, March 29, 2012, 08:43


comments powered by Disqus