Last Updated: Sunday, November 20, 2011, 05:29
झी २४ तास वेब टीम, अमरावतीकापसाच्या प्रश्नावर उपोषण करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारासाठी अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयातही त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवल्याने पोलीस आणि आरोग्य प्रशासनासमारे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळं रवी राणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. राज्यात कापसाचा प्रश्न सुटल्याने तिढा अधिकच वाढत चालला आहे. शिवसेना, मनसे, भाजपा आदी राजकीय पक्ष आंदोलनात उतरल्याने अधिक तीव्र झाले आहे.
First Published: Sunday, November 20, 2011, 05:29