Last Updated: Wednesday, April 11, 2012, 19:49
www.24taas.com, औरंगाबाद 
औरंगाबादमध्ये एका मद्यपी ड्रायव्हरने १० ते १५ जणांना उडवले आहे. औरंगाबादच्या पैठणगेट ते गुलमंडी भागातली घटना दारुच्या नशेत औरंगाबादमध्ये ड्रायव्हरचा हा हैदोस सुरू होता. त्यामुळे या भागातील वातावरण काही काळ चिंताजनक झालं होतं.
औरंगाबादमध्ये मद्यपी इंडिका चालकाने दहा ते १५ जणांना ठोकरले. पैठण गेट ते गुलमंडी परिसरात ही घटना घडली. ड्रायव्हर हा दारूचा नशेत तर्रर होता. त्यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला.
या गाडीचालकचा गाडीवरचा ताबा सुटल्याने त्याने १० ते १५ जणांना उडविले. मात्र त्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडले. ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याने स्थानिकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
First Published: Wednesday, April 11, 2012, 19:49