अजित पवारांच्या सभेतच 'बत्ती गुल' - Marathi News 24taas.com

अजित पवारांच्या सभेतच 'बत्ती गुल'

www.24taas.com, परभणी
 
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या सभेतच बत्ती गुल झाल्याची घटना परभणीत घडली आहे. परभणी मनपा निवडणूक प्रचारासाठी अजित पवारांची सभा योजित करण्यात आली होती.
 
या सभेत अजित पवारांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला. वीज गायब झाल्यानं अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. धावपळीनंतर १० मिनिटांनी वीज पुन्हा परतली.
 
मात्र उर्जामंत्र्यांच्याच सभेत बत्ती गुल झाल्याने त्याना भारनियमानचं गंभीर स्वरूप नक्कीच लक्षात आलं असणार. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या उर्जामंत्र्यांच्या सभेत तरी बत्ती गुल होणार नाही याची कार्यकर्ते नक्कीच काळजी घेतील, पण त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या भारनियमनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
 
 

First Published: Wednesday, April 11, 2012, 21:48


comments powered by Disqus