Last Updated: Friday, April 13, 2012, 16:43
www.24taas.com, लातूर लातूर महानगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलासरावांना टार्गेट करत चांगलीच टीका केलीये. एकेकाळी लातूर पॅटर्नमुळे गाजणारं लातूर आता घोटाळ्यांमुळे बदनाम होऊ लागल्याची टीका करत त्यांनी विलासरावांवर नाव न घेता टीका केली आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे. लातूरमध्ये विलासरावांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोन नेत्यांमध्ये राजकीय फिक्सिंग असल्याचा आरोपही अजित पवारांनी केला आहे. एकूणच बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंना शह दिल्यानंतर आता लातूरमध्ये विलासरावांना कोंडीत पकडत लातूरची सत्ता काबीज करण्याचा चंग अजित पवारांनी बांधलेला दिसत आहे. त्यात किती यश येते याकडे लक्ष लागले आहे.
संबंधित आणखी बातम्या 
प्रचारात राज्यपाल, आचारसंहितेचा भंग?लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं राज्यपाल असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा फोटो प्रचारासाठीच्या पोस्टरवर वापरला आहे. आचारसंहितेचा भंग केला असल्यानं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे.

देशमुखांनी केली आचारसंहिता भंग?लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना विलासराव देशमुख यांचे पूत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चानं केला आहे.
First Published: Friday, April 13, 2012, 16:43