Last Updated: Saturday, April 14, 2012, 15:20
www.24taas.com, नांदेड नांदेड वसमत मार्गावर प्रवासी वाहतूक करणा-या टाटा मॅजिक व्हॅन आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झालाय तर १६ जण जखमी झालेत. काल संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात घडला.
लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी हे प्रवासी गेले होते. ते रेवनसिंग तांडा आणि जांभरून तांडा इथले हे सारे प्रवासी होते. जखमींवर नांदेड आणि वसमतमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकाश चव्हाण, नथुराम चव्हाण, उज्ज्वला चव्हाण, कुंडलीक राठोड, उत्तम राठोड, मोहन राठोड, धर्मा राठोड. कमळाबाई जाधव, गोरसिंग भुसारे, प्रल्हाद जाधव अशी मृतांची नावं आहेत.
यातील १२ जणांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कुरूंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एस. हाके, पोना भुजंग कोकरे, बालाजी मिरासे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून पोलिसांनी त्यांना वसमतला रूग्णालयात दाखल केले आहेत.
First Published: Saturday, April 14, 2012, 15:20