'झी २४ तास'चा दणका, पोलीस निलंबित - Marathi News 24taas.com

'झी २४ तास'चा दणका, पोलीस निलंबित

www.24taas.com, उस्मानाबाद
 
उस्मानाबादच्या बलात्कारीत कुमारी मातेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अझीझ अनदूरकर यांना निलंबित करण्यात आलं आहे.
 
'झी २४ तास'नं कुमारी माता बलात्कार प्रकरणाला वाचा फोडली आहे. 'झी 24 तास'च्या वृत्तानंतर बलात्कार करणारा आरोपी समीर खापरेला अटक केली आहे. खापरेविरोधात बलात्कार आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या आईवडिलांना कट रचल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींनंतर आता कामात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे.
 
झी २४ तासचा दणक्यामुळे पीडित मुलीला न्याय मिळाला आहे. बलात्कार झाल्यामुळे कुमारी माता बनलेल्या १२ वर्षीय पिडीत मुलीची तक्रार नोंदवून न घेणारे पोलिस निरिक्षक अझीझ अनदुरकर यांचं निलंबन झालं . 'झी 24 तास'नं या बातमीचा पाठपुरावा केला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अझीझ अनदुरकर यांना निलंबीत करण्यात आलं आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, April 15, 2012, 15:10


comments powered by Disqus