Last Updated: Monday, April 16, 2012, 11:54
www.24taas.com, लातूर राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले असताना ११.१५ वाजताच लातूर पालिकेत काँग्रेसने ४९ चा आकडा गाठत पुन्हा आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांनी अखेर बाजी मारली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
लातूरमध्ये विलासरावांविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार टीका केली होती. भाजपचे गोपीनाथ मुंडे आणि विलासरावांचे साटेलोटे असल्याचा आरोप करून प्रचारात आघाडी घेतली होती. परंतु लातूरमध्ये विलासरावांनी पुन्हा बाजी मारल्याचे स्पष्ट बहूमतावरून स्पष्ट झाले आहे.
७० जागांपैकी ३६ चा जादूई आकडा गाठण्याची आवश्यक असताना काँग्रेसने ५० चा आकडा गाठून निर्वीवाद बहूमत मिळविले आहे.
पक्षीय बलाबलकाँग्रेस -४९ , राष्ट्रवादी -१३, शिवसेना-६ आणि अन्य -१
First Published: Monday, April 16, 2012, 11:54