सरकार मोहीम पैसे अडवा, पैसे जिरवा- अण्णा - Marathi News 24taas.com

सरकार मोहीम पैसे अडवा, पैसे जिरवा- अण्णा

www.24taas.com, औरंगाबाद
 
सक्षम लोकायुक्तांसाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या अण्णांनी दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारवर तोफ डागली आहे. पॅकेज देऊनही दुष्काळ संपत नाही असा टोला अण्णांनी हाणला आहे. आम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबवतो. मात्र सरकार पैसे अडवा, पैसे जिरवा मोहीम राबवते.
 
अशी टीका अण्णांनी केली आहे. पॅकेजचा पैसा गरजूंपर्यंत जात नाही तर राजकारण्यांच्या घशात जातो असा आरोपही अण्णांनी केला आहे. औरंगाबादमध्ये घेतलेल्या रॅलीत त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला केला. दरम्यान आज अण्णा जालन्यात सभा घेणार आहेत.
 
तसेच माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी लोकपालवर केलेलं विधान योग्यच असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. लोकपाल जेल भरण्याची मशिन होईल या कलामांच्या विधानाला अण्णांनी सहमती दर्शवली आहे.
 
 
 
 

First Published: Thursday, May 3, 2012, 08:33


comments powered by Disqus