Last Updated: Monday, November 28, 2011, 12:11
झी २४ तास वेब टीम, बुलढाणा 
आज पहाटे बुलढाणा जिल्ह्यात मेहेकरजवळ दोन लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले. तर जखमींपैकी ५ जणांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
रॉयल ट्रॅव्हल्स आणि सैनी टॅव्रहल्सच्या दोन्ही बसची समोरासमोर टक्कर झाली या टक्करीनंतर रॉयल ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच बसने पेट घेतला, यात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना अजूनही करण्यात आली नाहीये.
First Published: Monday, November 28, 2011, 12:11