Last Updated: Saturday, May 5, 2012, 13:05
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादच्या मुकुंदवाडी चौकातील पीव्हीआर थिएटरजवळ मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत 32 टप-या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. आग इतकी भीषण होती की अगदी तासाभरातच या टप-या बेचिराख झाल्या.
रात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. या टप-यांमध्ये ठेवलेले पाच गॅस सिलेंडर या आगीमुळे फुटले आणि आगीनं आणखी रौद्र रुप धारण केले. त्यातच टप-यांवरून जाणा-या विजेच्या हाय व्होल्टेजच्या तारा तुटल्याने आग आणखी भडकली आणि परिसरातला वीज पुरवठाही खंडित झाला.
आग लागल्य़ानंतर बघ्यांची गर्दी आणि ट्राफीक जाम झाल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्याच प्रचंड अडचणी आल्या मात्र अखेर पहाटे 5 च्या सुमारास आग विझवण्यात यश आले.. या आगीत छोट्या व्यापा-याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल.
First Published: Saturday, May 5, 2012, 13:05