Last Updated: Thursday, December 5, 2013, 19:51
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद,कारची काच फोडून तब्बल ६९ लाखाची रोख लंपास केल्याची घटना औरंगाबाद मध्ये घडली. शहरातील उद्योजकाने जमिनीचा व्यवहार करण्यासाठी ही रोख रक्कम रजिस्ट्री कार्यालयात आणली होती.
औरंगाबादच्या रजिस्ट्री कार्यालयाच्या आवारातून कारची काच फोडून चोरट्याने तब्बल ६९ लाखाची रोख रक्कम लंपास केली. या गाडीत औरंगाबाद शहरातील लक्ष्मीकांत धूत या उद्योजकाने जमिनीचा व्यवहार करण्यासाठी वाळूंजमधल्या कोटक महिंद्रा बँकेतून सत्तर लाखाची रोख काढली.
काल संध्याकाळी जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी धूत पाचच्या सुमारास रजिस्ट्री कार्यालयात आले... कार्यालयात जमिनीचा व्यवहार करून जेव्हा ते आपल्या गाडी जवळ आले तर गाडीची काच फोडून चोरट्यांनी ६९ लाखाची रोख लंपास केली होती.
घटनेची माहिती समजताच सिटीचौक पोलिस घटना स्थळी दाखल होऊन त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जाणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 5, 2013, 19:18