फरार ‘सिमी’चे कार्यकर्ते औरंगाबादेत येण्याची शक्यताChance Escaped 6 SIMI members from MP jail will came in Aurangabad

ते फरार ‘सिमी’चे कार्यकर्ते औरंगाबादेत येण्याची शक्यता

ते फरार ‘सिमी’चे कार्यकर्ते औरंगाबादेत येण्याची शक्यता
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

मध्य प्रदेशच्या खंडवा कारागृहातून मंगळवारी पसार झालेले ‘सिमी`चे गुन्हेगार औरंगाबाद शहरात येण्याची शक्यीता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सहा महिन्यांपूर्वी याच गुन्हेगारांनी ‘एटीएस`ला धमकीचं पत्र पाठविले होतं. या पार्श्विभूमीवर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

सिमी अर्थात ‘स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख डॉ.अबू फैसलखान, महंमद इम्रान खान याच्यासह सहा जण मंगळवारी खंडवा कारागृहातून पसार झाले होते. त्यामध्ये एजाजोद्दीन ऊर्फ एजाज ऊर्फ रियाज ऊर्फ राहुल महम्मद एजाजुद्दीन, अमजद रमजान खान, अस्लम ऊर्फ महम्मद अस्लम ऊर्फ सोहेब ऊर्फ बिलाल ऊर्फ संतोष महम्मद अय्युब, झकिर हुसेन सिद्धीकी ऊर्फ विकी डॉन ऊर्फ विनायककुमार बद्रुल हुसैन, मेहबूब गुड्डू मलिक इस्माईल यांचा समावेश आहे. त्यामुळं संपूर्ण देशभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या गुन्हेगारांची माहिती मिळाल्यास पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी केलंय.

पोलिसांनी शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर नाकाबंदी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्याचप्रमाणं शहरातील हॉटेल, लॉज आणि संभाव्य ठिकाणांचीही पोलिसांनी तपासणी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 10:29


comments powered by Disqus