तुळजाभवानी देवी मंदिरात चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू तर १९ जखमी, Tuljapur stampede in Tuljapur Bhavani Temple

तुळजाभवानी देवी मंदिरात चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू तर १९ जखमी

तुळजाभवानी देवी मंदिरात चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू तर १९ जखमी
www.24taas.com , वृत्तसंस्था, सोलापूर

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सणाला गालबोट लागलं आहे. तुळजापूरातील तुळजाभवानी देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाचा जागीच मृत्यू तर १९ भावीक जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

अन्य भाविकांवर तुळजापूरच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रात्री उशीरा ही घटना घडली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. आज नवरात्रीचा पहिलाच दिवस असल्यामुळे देविचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळली होती.

मात्र त्या दृष्टीने मंदिरात कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही आणि महाद्वारा जवळील गेट बंद करताना भाविकांची उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवणं प्रशासनाला जमलं नाही त्यामुळेच हा प्रकरा घडला आहे. चेंगराचेंगरीमुळे गोंधळ उडाळा आहे. दुर्घटना घडल्याने संपाप व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, October 5, 2013, 07:10


comments powered by Disqus