Last Updated: Monday, March 18, 2013, 15:30
www.24taas.com,अकोलाअकोल्यात धक्कादायक घटना घडलेय. मामानेच भाचीला जीवंत पेटवून दिलं. भाचीने शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने हे कृत केलंय. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातल्या खिनखिनी गावात ही घटना घडलीये. १४ वर्षांच्या भाचीकडे मामाने लैंगिक संबंधाची मागणी केली. मात्र भाचीने शारिरीक संबध ठेवण्यास नकार दिल्यानं वासनांध चुलत मामानं तिला पेटवून दिलं. यात ती ९५ टक्के भाजली.
गंभीर भाजल्याने या भाचीचा मृत्यू झाला. या प्रकरणी वासनांध मामा प्रमोद सोळुंके याला अटक करण्यात आलीये. त्या चुलत मामाच्या या वागण्याचा परिसरातून संताप व्यक्त होत असून कठोर शिक्षा होण्याची मागणी करण्यात आली आहे.
First Published: Monday, March 18, 2013, 15:17