पैठणमध्ये संस्थाचालकाचं विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्यunnatural act with 13year old boy in Paithan

पैठणमध्ये संस्थाचालकाचं विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य

पैठणमध्ये संस्थाचालकाचं विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य
www.24taas.com, झी मीडिया, पैठण

पैठणमध्ये वारकरी पंथाचे शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय मुलासोबत त्याच वारकरी संस्था चालकानं अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. नारायण रामभाऊ साळुंके असं या संस्थाचालकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आलीय.

पैठणमधल्या भक्तीनगर भागात ‘महर्षी वाल्मिकी वारकरी शिक्षण संस्था’ तो चालवत होता. मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्याला धमकावून अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नारायण सांळुकेवर अनैसर्गिक कृत्य आणि प्रिवेन्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुयल ऑफेन्सेस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ४ विद्यार्थ्यांनी या महाराजाविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पैठण पोलीस ठाण्यात नारायण साळुंके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 22, 2013, 11:01


comments powered by Disqus