Last Updated: Saturday, January 12, 2013, 13:15
www.24taas.com, उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये गेल्या आठवड्यात छेडछाडीला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतलेल्या मुलीचा अखेर मृत्यू झालाय. इयत्ता पाचवीत शिकणारी ही मुलगी होती.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील रुई गावातली ही दुर्दैवी घटना आहे. छेडछाडीला कंटाळून तिने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर या मुलीला बीडमधील लाईफलाईन रुग्णालयात रुग्णालायात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मोठ्या प्रमाणात भाजल्यानं अखेर तिचा आज मृत्यूशी झुंज संपली. या घटनेमुळे रुई गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. छेडछाड करणारा हा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
First Published: Saturday, January 12, 2013, 13:15