Last Updated: Monday, December 31, 2012, 14:09
www.24taas.com,उस्मानाबादपैशांची चणचण असल्यानं महसूल विभागाच्या वाहानांना पेट्रोल मिळत नसल्याचा मुद्दा चर्चेत असताना आता पोलिसांच्या बाबतीतही हा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या वाहनांना डिझेल पुरवठा करणे पेट्रोल पंपचालकांनी बंद केले आहे. ५० लाख रुपयांच्या थकीत उदारीकरणामुळे उस्मानाबाद पोलिसांवर ही नामुष्की ओढवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून उस्मानाबाद पोलिसांच्या गाड्या पोलीस स्टेशन आवारात उभ्या आहेत.
गाड्या उभ्या असल्यामुळं दिवस-रात्रीच्या गस्ती सोबतच दैनंदिन कामकाजावरही परिणाम झालाय. उस्मानाबाद पोलिस दलात एकूण ११० मोठी आणि ५० छोटी वाहने आहेत. त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवरून इंधनाचा पुरवठा केला जातो.
आंदोलनांची संख्या वाढलेली असताना पोलीस प्रशासन आणि गृह विभागाची बेफिकिरी जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरू शकते.
First Published: Monday, December 31, 2012, 14:09