Last Updated: Tuesday, September 4, 2012, 23:07
www.24taas.com,औरंगाबादकोळसा खाण घोटाळा प्रकरणी काँग्रेस खासदार विजय दर्डा प्रमोटर असलेल्या जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडसह पाच कंपन्यांवर छापे टाकल्यानंतर सीबीआयनं संध्याकाळी एफआयआर दाखल केला.
चुकीची आकडेवारी आणि सादरीकरण करून कोळसा खाणी मिळवल्याप्रकरणी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार विजय दर्डा आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह पाच कंपन्यांच्या २० आजी - माजी संचालकांवर सीबीआयने मंगळवारी गुन्हे दाखल केले.
यामध्ये खासदार दर्डा यांच्यासह त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, मनोज आणि अभिषेक जैसवाल यांची नावं आहेत. सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ एनर्जीचे संचालक या नात्यानं विजय दर्डा यांचे नाव एफआयआरमध्ये टाकण्यात आलंय. खासदार दर्डा यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
कोळसा खाणींच्या वाटपातील भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगाने ( सीव्हीसी ) दिलेल्या आदेशानुसार , तीन महिने तपास करून सीबीआयने मंगळवारी थेट कारवाई सुरू केली.
First Published: Tuesday, September 4, 2012, 23:07