वाशिम जिल्हातील ६ पंचायतींच्या निवडणुका जाहीर, Washim District Council Election declared

वाशिम जिल्हातील ६ पंचायतींच्या निवडणुका जाहीर

वाशिम जिल्हातील ६ पंचायतींच्या निवडणुका जाहीर
www.24taas.com, झी मीडिया, वाशिम

वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. यानुसार वाशिम जिल्हा परिषदेबरोबरच कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम या पंचायत समित्यांसाठी २२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. ३ डिसेंबर २०१३ ते शनिवार दि. ७ डिसेंबर २०१३ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. ९ डिसेंबर २०१३ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक जेथे अपिल नाही तेथे शनिवार दि.१४ डिसेंबर २०१३ व जेथे अपिल आहे तेथे बुधवार दि. १८ डिसेंबर २०१३ हा असून रविवार दि. २२ डिसेंबर २०१३ रोजी मतदान घेण्यात येईल.

मतमोजणी दि. २३ डिसेंबर २०१३ रोजी करण्यात येऊन निवडून आलेल्या सदस्यांची नावे मंगळवार दि. २४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिध्द करण्यात येतील.

सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती क्षेत्रात आज रात्री १२.०० वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 29, 2013, 13:54


comments powered by Disqus