Last Updated: Thursday, February 21, 2013, 17:08
www.24taas.com,परळीपरळी वीज केंद्राचा पाण्याचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना, दुष्काळ पाण्याचा नव्हे, तर नियोजनाचा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
परळी परिसरात असेलल्या जलसाठ्यांमध्ये वीज केद्राला पुरेलं इतकं पाणी आहे.. मात्र सध्या ते पाणी राखून ठेवल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे ते ना शेतीसाठी मिळतंय, ना वीजनिर्मितीसाठी.
बाष्पीभवनानं हे पाणी उडून गेलं, तर आपली गत `तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला` अशीच होणार आहे. या सगळ्याला जबाबदार आहे राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष आणि अधिका-यांची बेपर्वाई.
केवळ पाच कोटी वाचवण्यासाठी दिवसाला १३ कोटींचं नुकसान होत असल्याचं यामुळे स्पष्ट झालंय.
First Published: Thursday, February 21, 2013, 17:07