Last Updated: Sunday, October 21, 2012, 10:30
www.24taas.com, औरंगाबादतहानलेल्या मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलंय. अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशानुसार धरणातून 5 हजार क्यूसेक्सनं पाणी सोडण्यात येतंय.
दुपारी 2 वाजता हे पाणी निळवंडेत पोहोचेल. त्यानंतर हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. तीन दिवसांनी पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केलीय. परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आलीय. प्रवरा नदीतून हे पाणी जायकवाडीला जाणार असल्यानं नदीपात्रालगतच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलाय.
नदीवरील सर्व 14 बंधा-यांच्या फळ्या काढण्यात आल्यात.. नदीपात्राशेजारील गावांतल्या लोकांनी अनधिकृतपणे पाणी उपसू नये यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आलीय.
First Published: Sunday, October 21, 2012, 10:30