24taas.com, what happening in maharashtra?

हे काय चाललंय महाराष्ट्रात?

हे काय चाललंय महाराष्ट्रात?
www.24taas.com, उस्मानाबाद आणि नांदेड

उस्मानाबादमध्ये एका कॉलेज युवतीनं आत्महत्या केलीय. छेडछाड आणि तरुणाच्या त्रासाला कंटाळून या तरूणीनं आत्महत्येचा मार्ग स्विकारला. तुळजापूर तालुक्यातील पांगरधर वाडीत ही घटना घडलीय. मनिषा जाधव असं मरण पावलेल्या तरूणीचं नाव आहे. दरम्यान, आरोपी सतीश मते फरार असून तामलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे काय चाललंय महाराष्ट्रात?

तर दुसरीकडे, नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका कॉलेज तरूणीची भोसकून हत्या करण्यात आलीय. नांदेडच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात ही घटना घडलीय. आरोपी प्रदीप गंगावले याचं कोमल कादरगुट्टे हिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. तिला मारल्यानंतर या युवकानंदेखील आत्महत्यतेचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केलीय.

First Published: Tuesday, August 14, 2012, 14:59


comments powered by Disqus