नांदेडमध्ये सेना-मनसे युती होणार? Will Sena- MNS come together in Nanded?

नांदेडमध्ये सेना-मनसे युती होणार?

नांदेडमध्ये सेना-मनसे युती होणार?
www.24taas.com, नांदेड

वाघाळा शहर महापालिकेची निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांतच महापालिकेची निवडणूक जाहीर होईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत.

शिवसेनेनंही निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यासाठी शिवसेना उपनेते आमदार विनायक राऊत सध्या नांदेडमध्ये आहेत. याच दौ-यात झी 24 तासशी बोलताना त्यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात होण्याचे संकेत दिलेत. महापालिका निवडणुकीत मनसेनं प्रस्ताव ठेवल्यास युती कऱण्याबाबत विचार केला जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी झी 24 तासशी बोलताना दिली.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं भाजप आणि रिपाई या आपल्या मित्र पक्षांशी युती कऱणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलंय. मात्र मनसेशी युतीचा पर्यायही खुला असल्याच्या आमदार राऊतांच्या वक्तव्यानं उद्धव आणि राज ठाकरेंच्या जवळीकतेनंतर आता पुढचा टप्पा शिवसेना - मनसेतील जवळीकता असल्याचे संकेत मिळताएत... त्यामुळे नांदेड महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेच्या नव्या समीकरणाची सुरुवात होते काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

First Published: Thursday, August 30, 2012, 08:27


comments powered by Disqus