Last Updated: Saturday, November 17, 2012, 21:18
www.24taas.com, मुंबईबाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्याचं वृत्त समजताच सबंध महाराष्ट्रात बंदसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ मुंबईतलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील थिएटर्स बंद करण्यात आली आहेत. तसंच रविवारीदेखील संबंध महाराष्ट्रातलली सिनेमागृहं बंद ठेवण्यात येणार आहे.
सिनेमागृहांप्रमाणेच महाराष्ट्रभरातील नाट्यगृहंदेखील बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुले शनिवार आणि रविवारसारख्य़ा महत्वाच्या दिवशी महाराष्ट्रात कुटल्याही सिनेमाचा शो होणार नाही आणि एकाही नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऍडव्हान्स बुकिंगमुळे ज्या लोकांनी रविवारच्या सिनेमांची तिकिटं यापूर्वीच काढली आहेत, त्यांना त्यांच्या तिकिटांचे पैसेही परत करण्याची तयारी सिनेमागृहाच्या मालकांनी तसंच नाट्यगृहाच्या मॅनेजर लोकांनी दाखवली आहे.
First Published: Saturday, November 17, 2012, 21:18