बच्चन यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, शारीरिक इजा Bachchans injure in melee

बच्चन यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, शारीरिक इजा

बच्चन यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, शारीरिक इजा
www.24taas.com मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर झाल्याचं कळताच ताबडतोब ‘मातोश्री’वर पोहोचले ते सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचे सुपुत्र अभिषेक बच्चन. गेली सबंध रात्र अमिताभ आणि अभिषेक बाळासाहेबांसोबत असताना मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमू लागली होती.

सुमारे ५००० शिवसैनिक भावूक होऊन मातोश्रीबाहेर उभे होते. या शिवसैनिकांनी भावनेच्या भरात कुठलाही उपद्रव करू नये यासाठी त्यांना शांततेचं आवाहन करण्यासाठी अमिताभ आणि अभिषेक बच्चन मातोश्री बाहेर आले होते. मात्र बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत चिंतीत झालेल्या जमावाने अमिताभ बच्चन यांना धक्काबुक्की केली. यामध्ये दोघांनाही शारीरिक इजा झाली.

अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ट्विट करताना सांगितलं, “होय, मला आणि अभिषेकला धक्काबुक्कीत थोडं खरचटलं. पण आम्ही ठीक आहोत. ‘मातोश्री’वरील डॉक्टरांनी आमच्यावर प्रथमोपचार केले.”

First Published: Thursday, November 15, 2012, 10:38


comments powered by Disqus