बाळासाहेबांची प्रकृती गंभीर, सिनेसृष्टी दिवसभर बंद Bal Thackeray critical: Mumbai film industry shut

बाळासाहेबांची प्रकृती गंभीर, सिनेसृष्टी दिवसभर बंद

बाळासाहेबांची प्रकृती गंभीर, सिनेसृष्टी दिवसभर बंद
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी समजताच बॉलिवूडही ओस पडलं. गोरेगावची फिल्मसिटी आज बंद ठेवण्यात आली. सिने आर्टिस्ट्स आणि इतर संघटनांनी बाळासाहेबांसाठी उस्फुर्त बंद पुकारल्यामुळे आज मुंबईत कुठेही शुटिंग होऊ शकलं नाही.

मिळालेल्या वृत्तानुसार आज दिवसभरात मुंबईमध्ये एकाही सिनेमाचं किंवा सिरीअलचं शुटिंग झालं नाही. बऱ्याच कलाकारंनी आज स्वतःहून काम न करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय बॉलिवूडमधील बरेच कलाकार बाळासाहेबांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते.

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेक याच्यासह काल रात्रीच मातोश्रीवर उपस्थित राहिले होते. तसंच सध्याचा बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानही आपली सर्व शूट्स रद्द करून बाळासाहेबांची विचारपुस करण्यासाठी आला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा भाऊ अरबाझ खान आणि वडील सलीम खानही होते. याव्यतिरिक्त गोविंदा तसंच कपूर फॅमिलीतील रणधीर, ऋषी आणि राजीव कपूरही मातोश्रीवर आले.

First Published: Thursday, November 15, 2012, 17:37


comments powered by Disqus