Last Updated: Wednesday, November 14, 2012, 23:56
www.24taas.com,मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत. राज ठाकरे आपल्या परिवारासह मातोश्रीवर उपस्थित झाले आहेत. तसेच शिवसैनिकही मातोश्रीबाहेर जमले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत बिघडली आहे. मातोश्रीवरच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. जलाल पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा चमू बाळासाहेबांवर उपचार करत आहेत. बाळासाहेबांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आणि त्यांचे कुटुंबिय बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.
बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्री बाहेर पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
राज ठाकरे हे दोघंही मातोश्रीवर उपस्थित आहेत. बुधवारी रात्री उशीरा राहुल शेवाळे, रविंद्र वायकर, सुभाष देसाई हेही मातोश्रीवर दाखल झाले होते. शिवसेनेचे इतर महत्त्वाचे नेतेही मातोश्रीवर दाखल झाले आहे.
First Published: Wednesday, November 14, 2012, 23:41