बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल फेसबुकविश्व चिंताग्रस्त,Thackeray`s health worried about Facebook World

बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल फेसबुकविश्व चिंताग्रस्त

बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल फेसबुकविश्व चिंताग्रस्त
www.24taas.com, मुंबई

काल (१४.११.१२) जेव्हापासून शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या नाजुक प्रकृतीबद्दल वृत्त हाती आलं, तेव्हापासून सोशल नेट वर्किंग साईट आणि फेसबुकविश्व त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त झाले. कोण काय म्हणालंय, यावर एक नजर.

लोकांचे प्रेम

बाळासाहेब ठाकरेंच्या नाजुक प्रकृतीबद्दल बातमी हाती आली, तेव्हापासून सर्वजण चिंतेत आहेत. अनेकांनी त्यांची प्रकृतीबद्दल देवाकडे मागणे मागितले. मातोश्रीवर जाणाऱ्यांची गर्दी तर पाहा. ही गर्दी भाड्याची नाहीच. आपल्या संपूर्ण आयुष्यात या माणसाने जर काय कमावले असेल तर लोकांचे प्रेम. काय जिंकले असेल तर लोकांची मने. अशा या अवलिया माणसाची तब्येत लवकर ठणठणीत होवो. अन त्यांना दिर्घायुष्य लाभो हेच आई भवानीकडे मागणे.

काळजीचा संवाद

हॅलो आई, टीव्ही सुरु आहे ना.. बंद नको करू.. बरे आहेत ना.. अजून काही बातमी नाही ना.. मला सांगशील लगेच... मी स्टेशनला पोहचतोय... सगळं ओके आहे आत्ता रस्त्यावर.. पण मला कळवं ओके .. हा संवाद बाळासाहेबांविषयीचा आज सकाळी बसमध्ये ऐकलेला.. असा एकच संवाद नाही.. वेगवेगळ्या शब्दांत, वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये बसमध्ये, स्टेशनवर, ट्रेनमध्ये, रस्त्यावर, चौकाचौकात असचं काहीसं काळजीचे संवाद ऐकायला मिऴतं होते... खरं तर बोलाणारा प्रत्येकजण शिवसैनिक नसेलही.. पण का बरं एवढी काळजी वाटावी प्रत्येकाला.. या संवादामधील प्रत्येकाचं असं काय कनेक्शन असावं बाळासाहेबांशी.. ते काही नातेवाईक नाहीत, जिवाभावाचे मित्र नाहीत, बाळासाहेब या प्रत्येकाला ओळखतही नाहीत तरीही.. यालाचा म्हणतात का दैवत.. बहुधा..

यमराज हार गया...

कुलीच्या शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर बाळासाहेब मला भेटायला आले होते. त्यांना माझ्या हातात एक व्यंगचित्र दिले. ते यमराजाचे होते. त्यावर लिहिले होते, `यमराज हार गया`. मलाही व्यंगचित्र काढता येत असते तर मीही त्यावर असेच लिहिले असते. `यमराज हार गया...! बाळासाहेबांचे आयुष्य एका योद्धयासारखे आहे. ते योद्धयाप्रमाणेच आजही लढत आहेत. त्यांना गरज आहे आपल्या प्रार्थनेची...!`- बिग बी, ट्विट

एकटा टायगर

बाळासाहेब, "उद्धव आणि राज" पेक्षा आम्हाला तुमची जास्त गरज आहे.
आता या वेळी जर या दोन भावांना एकत्र
येता आलं नाही तर आम्हाला पुढे तेएकत्र आले काय
आणि एकटे राहिले काय...काही देणं घेणं नाही.
आम्हाला फक्त तुम्ही हवे आहात.
कारण जंगलाततरी थोडेफार वाघ उरलेत. राजकारणात मात्र
एकटा टायगर तुम्हीच.....बाळासाहेब, लवकर बरे व्हा.
घरातला कर्ता आणि मोठा माणूस
आजारी असतांना आम्ही दिवाळी कशी साजरी करायची?

महाराष्ट्राचा ढाण्या वाघ

तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्रावर कुणाची वाईट नजर नाय.. तुम्ही आहात म्हणून ’बॉम्बे’ ला मुंबई म्हणत्यात.. तुम्ही आहात म्हणून माझ्या मातीवर जीव ओवाळून टाकावासा वाटतोय..महाराष्ट्राच्या या ढाण्या वाघाला तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो. हिच प्रार्थना...

आमचा श्वास

साहेब तुम्ही आमचा श्वास, तुम्ही आमचा ध्यास,
साहेब तुमच्यात आमचा प्राण, तुम्ही आमुचे ईमान,
साहेब तुम्ही आमची सावली, आमच्यासाठी प्रेमळ माउली,
साहेब तुमच्या चरणी जीवन समर्पण, आमचे
आयुष्यही तुम्हांला अर्पण.

First Published: Thursday, November 15, 2012, 11:47


comments powered by Disqus