बाळासाहेबांची प्रकृती स्थिर – राज ठाकरे, Bal Thackeray stable nature - Raj Thackeray

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर – राज ठाकरे

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर – राज ठाकरे
www.24taas.com, मुंबई

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. याचदरम्यान, पुतणे राज ठाकरे यांनी चागंली बातमी दिली, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे अधिक माहिती थोड्याच वेळात देतील, असे शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी माहिती देताना सांगितले.

निलम गोऱ्हे, चित्रपट दिर्ग्दशक मधुर भांडारकर, राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कालपासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी आहे.

आजही सकाळी शिवसैनिकांचा मातोश्रीवर ओघ सुरुच आहे. शिवसैनिक मातोश्री परिसरातच होते. तर पोलीस प्रशासनानही मातोश्री परिसरात मोठा फौजफाटा तैनात केलाय. सकाळी रॅपीड एक्शन फोर्सची एक टीमही परिसरात तैनात करण्यात आलीये.

बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम पडावा ते ठणठणीत बरे व्हावेत यासाठी राज्यात शिवसैनिकांनी मंदिरांत महाआरती आणि होमहवन सुरू केले आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी महाआरती केलीये. तर भोपाळमध्ये बाळासाहेबांसाठी यज्ञ केला जातोय.

First Published: Thursday, November 15, 2012, 15:41


comments powered by Disqus