...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा- बाळासाहेब, Balasaheb great orator

...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा- बाळासाहेब

...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा- बाळासाहेब
www.24taas.com, मुंबई

बाळासाहेबांचे फटकारे... कसे होते बाळासाहेबांच्या शब्दांचे फटकारे... बाळासाहेब म्हणजे शब्दांचा निखरा... आणि हाच निखारा आता थंड झाला आहे... मात्र त्यांचे फटकारे आजही कायम स्मरणात आहेत... कसे होते बाळासाहेबांचे हे फटकारे पाहूयात...

- ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत अभिमानाने, स्वाभिमानाने आणि आकाशाला गवसणी घालणार्‍या सुरात म्हणायचे असेल तर या काँग्रेजी भ्रष्ट टोळभैरवांना नष्ट करून शिवरायांचा भगवा झेंडा डौलाने फडकवा!

- इतिहासावर जगता येत नाही. इतिहास निर्माण करावा लागतो.

- चार दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवसा वाघासारखे जगा

- तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळवा... पण न्याय हा झालाच पाहिजे!

- सीमा भागासाठी केंद्राच्या विरोधात महाराष्ट्राकडून एक मोठा उठाव व्हायलाच हवा... आता अस्तन्या सावरून बसा... महाराष्ट्रा, तुला परत लढावेच लागेल!

- हा देश हिंदूंचा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जर तशी कोणाची इच्छा नसेल तर हिंदू म्हणून जगता कशाला? सरळ सुंता करुन टाका...!

- मुंबई ही धर्मशाळा नव्हे, शहरात येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखायचे असतील तर परमीट योजनाच राबवायला हवी.

- आत्मचरित्रे पुस्तकांच्या कपाटात नको. लोकांच्या कपाटात हवीत!

- नियम आणि कायदे कोणासाठी? लोकांना जेरीस आणण्यासाठी? जाळून टाका ते कायदे... जनहिताच्या आड येणारे नियम आणि कायदे बदलायलाच हवेत...!

First Published: Sunday, November 18, 2012, 07:44


comments powered by Disqus