बाळासाहेबांचे समाधीस्थळ शिवाजी पार्कातच, balasaheb memorial on shivaji park

बाळासाहेबांचे समाधीस्थळ शिवाजी पार्कातच

बाळासाहेबांचे समाधीस्थळ शिवाजी पार्कातच
www.24taas.com,मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळ शिवाजी पार्कातच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाजी पार्कात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मातीचा चौथरा बांधण्याचा निर्णय मनपाच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. ४० बाय २० एवढ्या जागेवर हा चौथरा बांधण्यात येणार असून गार्डनिंगही करण्यात येणार आहे.

या निर्णयाला सुरक्षेचं कारण देऊन मनसेनं मात्र विरोध दर्शवलाय़. तर कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर पाठिंबा देणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. सोमवारी रात्री शिवाजी पार्कवरील चौथरा हलवल्यानंतर पार्कातल्याच नवीन जागेच्या पर्यायासाठी ही बैठक घेण्यात आली होती.

शिवाजी पार्कवरील तो चौथरा हलवताना शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी अतिशय संयमित भूमिका दाखवलीये. शिवसैनिकांच्या या सामंजस्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतयं. स्मारकाबाबत भूमिका घेताना काही बोलघेवड्या आणि प्रसिद्धिलोलूप नेत्यांनी जे गमावलं होतं. ते संयमित भूमिका घेऊन शिवसैनिकांनी कमावलं आहे. शिवसैनिकांच्या या भूमिकेचं पुन्हा एकदा कौतुक आहे.

First Published: Tuesday, December 18, 2012, 19:22


comments powered by Disqus