बाळासाहेब लवकरच दर्शन देतील- राऊत, Balasaheb Speedily recover say`s Raut

बाळासाहेब लवकरच दर्शन देतील- राऊत

बाळासाहेब लवकरच दर्शन देतील- राऊत
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून कालच्‍या पेक्षा चांगली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. `मातोश्री`बाहेर येऊन संजय राऊत यांनी पत्रकारांना बाळासाहेबांच्‍या प्रकृतीबाबत माहिती दिली.

बाळासाहेब हे आमचे आणि राज्यातील शिवसैनिकांचे ईश्वर आहेत, ईश्वरी अवतार आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी नक्कीच चिंता करीत आहे. पण कालपेक्षा आज त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा आहे. आणि ते लवकरच बरे होतील.

ते म्‍हणाले, बाळासाहेबांच्‍या प्रकृतीमध्‍ये सुधारणा होत आहे. हजारो शिवसैनिक बाळासाहेबांसाठी येथे आले आहेत. लवकरच बाळासाहेब सर्वांना दर्शन देतील. शिवसैनिक हेच बाळासाहेबांचे टॉनिक आहे. त्‍यांच्‍या ऊर्जेतून बाळासाहेब त्‍याच शक्तीने उभे राहतील

First Published: Friday, November 16, 2012, 18:16


comments powered by Disqus