Last Updated: Wednesday, January 23, 2013, 09:31
www.24taas.com, मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती.. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी भारतीय चित्रपट सेनेने एक चित्रफित तयार केली आहे.
बाळासाहेब यांच्या जन्मदिनानिमित्त ही चित्रफित चित्रपटगृहांमध्ये दाखवली जाणार आहे. जवळपास दोनशे चित्रपटगृहांमध्ये चित्रफित दाखवून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
पक्षाचे जेष्ठ आमदार दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ही चित्रफित तयार करण्यात आली आहे. तसेच आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीत उद्धव यांच्या पक्षप्रमुखपदी नियुक्तीचा ठराव मांडला जाणार आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षप्रमुखपद नव्यानं निर्माण करण्यात येणार आहे. या पदावर आता उद्धव विराजमान होतील. तर युवानेते आदित्य ठाकरे यांनाही आज शिवसेनेचे नेतेपद देण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
First Published: Wednesday, January 23, 2013, 09:20