कोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी, Kokan Railway Night Railway Special

कोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी
www.24taas.com,रत्नागिरी

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखा महाराष्ट्रासह देश शोकसागरात बुडाला आहे. कोकणातील शिवसैनिकांसाठी मुंबईत येणाऱ्यासाठी मडगाव ते मुंबई खास रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे रात्री दहावाजता मडगाववरून सुटेल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त ४.४५ वाजता समजताच सर्वत्र दु:खाचा डोंगर शिवसैनिकांवर कोसळलला. महाराष्ट्राचा आधार हरपला. शिवसैनिक पोरके झालेत, अशी प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात ऐकायला मिळत आहेत. शिवसैनिकांना बाळासाहेबांचे अखेरचे दर्शन घेता यावे यासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाडी सोडण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना मुंबईत येणे शक्य होणार आहे.

First Published: Saturday, November 17, 2012, 21:41


comments powered by Disqus