Last Updated: Sunday, November 25, 2012, 22:41
www.24taas.com, सांगलीकोहिनूर मिलची जागा जाईल म्हणून मनोहर जोशी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कचा हट्ट करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे. माणिकरावांच्या या आरोपामुळे हा वाद लवकर शमणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.
तर दुसरीकडे मनोहर जोशीही स्मारकासाठी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं..अशा प्रसंगी कायदा विरोधात असेल तर कायदा हातात घेण्याचं आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलंय. इतर प्रश्न ज्याप्रमाणे शिवसेना हाताळते, तशाच प्रकारे शिवसेना स्टाईलनं हा प्रश्न हाताळला जाईल. असंही ते म्हणाले.
शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मारकास मराठी माणूसच विरोध करत असल्याचं दु:ख होत असल्याचं आणि त्याची चीडही येत असल्याचं सांगत त्यांनी मनसेलाही टोला हाणलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते.
First Published: Sunday, November 25, 2012, 22:25