बाळासाहेबांना सेनेच्या `सरां`नीही वाहिली आदरांजली!, manohar joshi at shivaji park

बाळासाहेबांना सेनेच्या `सरां`नीही वाहिली आदरांजली!

बाळासाहेबांना सेनेच्या `सरां`नीही वाहिली आदरांजली!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी हेही शिवतिर्थावर दाखल झाले. जोशी सरांनी जड अंत:करणाने बाळासाहेबांना मानवंदना वाहिली.

बाळासाहेबांच्या या पहिल्या स्मृतीदिनी अनेक मान्यवरांनी आणि विविध पक्षांच्या नेते मंडळींनी तसेच लाखो शिवसैनिकांनी गर्दी केली. मात्र, दसरा मेळाव्यात जोशी सरांबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर शिवतिर्थावर येणार की नाही असा दबक्या आवाजात सवाल होता. आपण शिवसैनिकच आहोत आणि शिवसेना आपलीच असून मला कोणाचीही भीती नाही, असं जोशी सरांनी म्हटलंय.

बाळासाहेबांना प्रथम स्मृतीदिनी मानवंदना देण्यासाठी शिवाजी पार्कवर गर्दी होतेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांनी बाळासाहेबांना स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हजेरी लावली. यावेळी पवारांसह त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. स्मृतीस्थळावर पवारांनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. या निमित्ताने ठाकरे - पवार एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रिपाई नेते रामदास आठवलेंनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिलीय तर दुसरीकडे शिवसैनिकांची गर्दीही शिवाजी पार्कवर पाहायला मिळाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 17, 2013, 14:56


comments powered by Disqus