बाळासाहेबांच्या आठवणीने मनोहर जोशी गहिवरले..., Manohar Joshi in Balasaheb Memories

बाळासाहेबांच्या आठवणीने मनोहर जोशी गहिवरले...

बाळासाहेबांच्या आठवणीने मनोहर जोशी गहिवरले...
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृती गंभीर असल्याने शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह इतरही नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते मनोहर जोशी अत्यंत भावूक झाले होते.

बाळासाहेबांची प्रकृती गंभीर आहे. परंतु सध्यातरी स्थिर आहे, त्यांनी आमच्यात परतावं असं म्हणत मनोहर जोशींचा कंठ दाटून आला. आपला आवंढा गिळून मनोहर जोशीं बाळासाहेबांच्या आठवणींनी जास्तच भावनाविवश झाल्याचे दिसून आले.

बाळासाहेब ह्यांच्या नशीबात काय आहे ते तर देव जाणे... मात्र त्यांनी आमच्यासोबत आणखी काही काळ असावं अशी मनोहर जोशींनी ईश्वरचरणी प्रार्थना केली. त्याचबरोबर ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी इच्छाही बोलून दाखवली. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कडवट शिवसैनिक असणाऱ्या मनोहर जोशी यांच्या चेहऱ्यावरील चिंता लपून राहिली नाही.

First Published: Thursday, November 15, 2012, 12:35


comments powered by Disqus